मी रवी पुजारी नाही अँथनी फर्नांडिस; ओळख पटवण्यासाठी पोलीस करणार डीएनए टेस्ट

0
1328

दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – सेनेगलमधून अटक करण्यात आलेला गँगस्टर रवी पुजारीने आपली ओळख नाकारली असून सेनेलग सरकारकडे त्याने त्यासंदर्भात अर्ज केला आहे. पुजारीच्या वकिलांनी सेनेगलच्या अधिकाऱ्यांकडे त्याचा पासपोर्ट जमा केला असून त्याचे नाव अँथनी फर्नांडिस असल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे गोंधळाची स्थिती तयार झाली आहे.

या घटनेमुळे पुजारीची ओळख पटवण्यासाठी आणखी कागदोपत्री पुरावे गोळा करण्यासाठी भारतीय दूतावासाने वेळ मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई आणि कर्नाटक पोलिसांना रवी पुजारीच्या कुटुंबियांचे डीएनए नमुने घेऊन ते तात्काळ सेनेगलला पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  पुजारीची पत्नी पद्मा आणि त्याच्या तीन मुलांकडे बुरकीना फासोचे पासपोर्ट आहेत. दोन आठवडयांपूर्वी पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून रवी पुजारीला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अनेक देशांमध्ये खंडणी तसेच हत्येचे गुन्हे दाखल आहेत.