प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ?   

0
589

लखनौ, दि. ११ (पीसीबी) – काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उत्तर प्रदेशच्या राजकारणातील प्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. गेल्या ३० वर्षांचा राजकीय वनवास संपविण्यासाठी काँग्रेस नेते  कामाला लागले असून  २०२२ मध्ये प्रियंका या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

उत्तर प्रदेशात प्रियांकांवर सोपवलेली जबाबदारी आणि त्यांचा राजकीय वावर पाहता २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.  आज होणाऱ्या प्रियांकांच्या रोड शोपूर्वी उत्तर प्रदेशातील काही नेत्यांनी याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

२०१७च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या एकूण ४०३ जागांपैकी काँग्रेसला फक्त ७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आल्यास पक्षाला राजकीयदृष्ट्या  उभारी मिळेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.