मी देखील अनेक रात्री रडून काढल्या आहेत- विद्या बालन

0
573

मुंबई, दि. १४ (पीसीबी)-  इंडस्ट्रीचा झगमगाट नेहमी समोर येत असला, तरी इथे संघर्षही तेवढाच करावा लागतो. अभिनेत्री विद्या बालनने आपल्या संघर्षाच्या आठवणी नुकत्याच सांगितल्या. ‘मी या इंडस्ट्रीत नवीन होते तेव्हा, अनेकदा मला भूमिका मिळेल असे वाटायचे.

पण ती मिळायची नाही. तो काळ संघर्षाचा होता. तेव्हा मी रात्रभर रडत बसायचे. अशा अनेक रात्री मी रडत घालवल्या आहेत. रोज सकाळी उठताना, आज काहीतरी चांगलं होईल अशी आशा मनात असायची’, असे तिने सांगितले.