बुधवार पेठेत वेश्या पत्नीचा पतीने केला खून

0
2024

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याच्या कारणावरुन पतीने बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या पत्नीचा गळा चिरुन खून केला. ही घटना आज (बुधवार) सकाळी सातच्या सुमारास घडली.

मिना गब्बर काजी शेख (वय ३०, सध्या रा. बुधवार पेठ, पुणे, मुळ रा. पश्चिम बंगाल) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पती इनामुल्ला मलीक शेख (वय ३२) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिना आणि इनामुल्ल हे दोघे बुधवार पेठेतील जुन्या बिल्डींगच्या पाचव्या मजल्यावर रहायला होते. मिना ही गेल्या दिड महिन्यापासून बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करत होती. यादरम्यान त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण व्हायचे. आज सकाळी देखील त्या दोघांमध्ये भांडण झाले आणि इनामुल्ला याने मिनाच्या गळ्यावर, पायावर चाकूने सपासप वार केले आणि पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मिनाला तेथील मुलींनी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे तपास करत आहेत.