मी दाऊद इब्राहिमला ही दम दिला आहे

0
550

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – मी दाऊद इब्राहिमला दम दिला आहे असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरे दिली. पत्रकारितेतील आपल्या कारकिर्दीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मी दाऊद इब्राहिम पासून अनेकांचे फोटो काढले आहेत. दाऊद इब्राहिमला दम देखील दिला आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे माझी फायर ब्रँड एडिटर अशी अनेक ओळख करून द्यायचे अशी आठवणही यावेळी त्यांनी सांगितली.

“रोज सकाळी सामना कुणी वाचला नाही तरी रोज टीव्हीवर सामना पाहायला मिळतोच यापेक्षा जास्त भाग्य कुठले,” असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. “खलनायक हा समाजाचा भाग आहे. माझ्या आसपास खलनायक फिरत असतात आम्ही त्यांना बघतो. आमच्या पक्षात कुणीही खलनायक नाही. पण ज्यां संजय राऊत यांच्यामुळे आम्हाला सत्ता मिळाली नाही  असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी मी खलनायक आहे,” असंही यावेळी ते म्हणाले.