‘मी टू’ प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणे गरजेचे – आदित्य ठाकरे

0
549

डोंबिवली , दि. १७ (पीसीबी) –  ‘मी टू’  प्रकरणात दोन्ही बाजू तपासून पाहणे गरजेचे आहे. एकीकडे कल नसावा, असे मत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.डोंबिवलीत आयोजित एका कार्यक्रमासाठी हजेरी लावण्यासाठी आदित्य ठाकरे आले होते. यावेळी ते बोलत होते.

‘मी टू’ सारख्या प्रकरणात पोलीस आणि सगळ्यांचाच कल नेहमी एका बाजूने असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या प्रकरणात  दोन्ही बाजू तपासून पाहणे गरजेचे आहे. यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

अक्षय कुमारसोबत युवासेना राज्यभरातील कॉलेज युवतींना सेल्फ डिफेन्सचे धडे देत असून अशात एसएनडीटी युनिव्हर्सिटीत झालेला प्रकार निंदनीय असल्याचेही ते म्हणाले. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.