मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा गुन्हेगार तडीपार

0
886

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा सराईतांना तडीपार करण्यात आले आहे. सोमवार (दि.२९) मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. यादरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून नये म्हणून हि कारवाई करण्यात आली आहे.

सध्या शिरूर मतदार संघात ३१ तर मावळ मतदार संघात ४७ संवेधनशील मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर पोलिसांचे विशेष पथक लक्ष ठेवून असणार आहे. तसेच या केंद्रांचे वेब कास्टिंग देखील केले जाणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मावळमध्ये ३३ हजार २२९ लिटर तर शिरूरमध्ये २५ हजार ८३ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही मतदार संघातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. मतदानादरम्यान गुन्हेगार प्रवृतीचे लोक दमदाटी करुन तसेच विविध गोष्टीचे आमिष दाखवून नागरिकांना मतदान करण्यास भाग पाडतात. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील दहा सराईतांना तडीपार करण्यात आले आहे.