“मालमत्ता कर आकारणी जी.आय.एस. सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे”

0
475

– शहरातील नागरिकांना आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

पिंपरी, दि. 18 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणा-या सर्व मालमत्तांचे जी. आय. एस. / GIS (भौगोलिक माहिती प्रणाली / Geographical Information System) सर्वेक्षण पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मार्फत हाती घेण्यात आलेले आहे, पारदर्शक प्रशासन व नागरिकांचा सहभाग वाढीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी ली. यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्वेक्षणाचे कामकाज करण्यात येणार आहे. तरी, मालमत्ता कर आकारणी जी.आय.एस. सर्वेक्षणास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत जी. आय. एस. प्रणालीचे नागरिकांना भविष्यातील होणारे फायदे लक्षात घेवून ही प्रणाली राबविण्यात येत आहे. यामध्ये, नागरिकांचा सहभाग व पारदर्शक प्रशासन, जी.आय.एस. प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रामधील मिळकतीसाठी सुधारीत सेवा, जी.आय.एस. प्रणालीद्वारे संसाधनांचे सुधारित नियोजन, जी.आय.एस. प्रणालीद्वारे नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन,जी.आय.एस.प्रणालीद्वारे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे.

सदर सर्वेक्षणासाठी शहरातील मालमत्ताचे फोटो व इतर आवश्यक माहिती संकलित करण्यासाठी अॅटॉस इंडिया प्रा.लि. यांचे मार्फत नियुक्त केलेले सर्व्हेअर / कर्मचारी (ओळखपत्रासह) यांची नेमणूक मिळकतीचे सर्वेक्षण करण्याकरिता करण्यात आलेली असून त्यांना आवश्यक माहिती तसेच मालमत्ता कर पावती, आधार कार्ड, वीज बिल आदी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्यास मदत करावी. तसेच, उपरोक्त बाबी लक्षात घेता नागरिकांनी आपल्या मालमत्तेचे जी.आय.एस. सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असेही महानगरपालिका आयुक्त तथा पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील प्रसिध्दीपत्रकाद्वारे म्हटले आहे.