मारूंजीत लाडशाखीय वाणी समाज राष्ट्रीय महाअधिवेशनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

0
652

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – लाडशाखीय वाणी समाजाच्या वतीने मारूंजी येथे आयोजित समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. २४) झाले. यावेली लाडशाखीय वाणी समाज्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला.

यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अधिवेशनाचे कार्याध्यक्ष कैलास वाणी, स्वागताध्यक्ष आर. एन. वाणी, अनिल चितोडकर, निलेश पुरकर, उद्योजक गोविंद शिरोळे, राजेश कोठावदे, गजानन मालपुरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या अर्थ, उद्योग, व्यापार क्षेत्रात लाडशाखीय वाणी समाजाचे मोठे योगदान आहे. भावी पिढीला शिक्षणासाठी पुणे, नाशिकसारख्या मध्यवर्ती ठिकाणी विद्यार्थी वसतिगृहाची गरज असल्याने समाजाला या ठिकाणी वसतिगृह बांधण्यासाठी सरकार जागा देईल.”

या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते समाज भूषण या स्मरणिकेचे प्रकाशन आणि वाणी चेंबर ऑफ कॉमर्सचे उद्‌घाटन करण्यात आले. तसेच दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांची शैक्षणिक जबाबदारी समाजाने घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास वाणी यांनी केले. सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर व समीरा गुजर यांनी केले. अभय नेरकर यांनी आभार मानले.