माझ्यावर पीएचडी करण्यासाठी चंद्रकांत पाटलांना १० ते १२ वर्ष लागतील – शरद पवार

0
549

मुंबई,दि.२३(पीसीबी) – “चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी १० ते १२ वर्षे लागतील” असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. ते राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेली ५० वर्ष राजकारणात आहेत. पण तरीही त्यांचा पक्ष १० पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. तरीही ते राजकारणात कायम केंद्रस्थानी असतात. त्यामुळे मला त्यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. यावरून शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना, महाविद्यालयीन निवडणुका व्हायला हव्यात. लोकशाहीत आपला प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य आहे, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. अभ्यास सोडून मी सर्व विषयांत पारंगत होतो. तसेच निश्चय केला तर काहीही मिळवता येतं, असं शरद पवारांनी सांगितलं.

दरम्यान, मी ८० वर्षांचा असलो तरी मन अजूनही तरूण आहे, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केला आहे.