माजी पंतप्रधान मनमोहन सिंग AIMS रुग्णालयात दाखल

0
467

प्रतिनिधी (पीसीबी) : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग याचा छातीत दुखायला लागल्याने त्यांना काल रात्री दिल्लीतील AIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना AIMS मधील कार्डीओ थोरासीस कक्षात ठेवण्यात आले आहे.
पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार सलग दोन वेळा पंतप्रधान राहीलेले ८७ वर्षीय मनमोहन सिंग यांना आयसीयू मध्ये ठेवण्यात आलेले नाही. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डाॅ. नितिश नाईक त्यांच्यावर उपचार करत आहेत. मार्च महिन्यामध्ये संसदेचे अधिवेशन तहकूब होण्यापूर्वी मनमोहन सिंग पडले होते. कोरोना वायरसचा संसर्ग नुकताच सुरु झाला असल्याने डांक्टकांनी त्यांना बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला होता.
मनमोहन सिंग सध्या राजस्थान मधुन राज्यसभेत निवडुन आले आहेत. माननोहन सिंग यांच्यावर सन १९९० व २००९ साली असे दोन वेळा बायपास सर्जरी करण्यात आल्या आहेत. लाॅकडाऊन ३ नंतर शासन नेमके काय करणार आहे ? असा सवाल त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोंदीना विचाराला होता.