भारतात काल दिवसभरात तब्बल ४ हजार ३५३ कोरोना पाॅझिटीव; १ मे पासून ३२ हजारांची वाढ

0
515

पुणे, दि. १० (पीसीबी) : भारतात कोरोनाचा तुफान वेगाने वाढत चालला आहे. काल दिवसभरात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात भारतात ४ हजार ३५३ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली आहेत. कालच्या दिवसात झालेली वाढ ही आत्तापर्यंतची एकाच दिवसात होणारी सर्वात मोठी वाढ आहे. देशभरात एकुण बाधितांची संख्या ६७ हजार १६१ इतकी झाली आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर मे महिन्याच्या सुरवातीस पासून इटली मध्ये कोरोना बाधीतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. १ मे ते १० मे या कालावधी इटलीमध्ये केवळ १३ हजार ६०७ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली. परंतु १ मे पासून भारतात ३२ हजार २९५ कोरोना पाॅझिटीव रुग्णांची वाढ झाली आहे.

केंद्र शासनाने लाॅकडाऊन – ३ ची घोषणा करताना रेड, ॲारेंज, ग्रीन व कन्टेंनमेंट झोन मध्ये वर्गीकरण केले व लाॅकडाऊनच्या अटीमध्ये टप्प्याटप्प्याने शिथीलता आणली जात आहे. परंतु मे महीना सुरु होताच देशात कोरोनाचा कहर अधिकच वाढु लागला आहे. दारु विक्री आणि परप्रांतीयांचे अनियंत्रीत स्थलांतरामुळेआत्तापर्यंतची पाळलेल्या सोशल डिस्टंसिंगची पार वाट लागली.

काल दिवसभरात कोरोनामुळे तब्बल १११ लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत मृत्यु झालेल्यांची संख्या २,२१२ इतकी झाली आहे. तसेच २० हजार ९६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.