माजी नगरसेवक प्रसाद शंकर शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्य किट मिठाई व कपड्यांचे वाटप

0
364

पिंपरी, दि. 17 (पीसीबी): माजी नगरसेवक प्रसाद शंकर शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त कै.प्रशांत शेट्टी प्रतिष्ठानाच्या वतीने वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजातील दुर्लक्षित घटकापर्यंत जीवनावश्यक वस्तू , मिठाई , कपडे , औषधे वाटप करण्यात आले.यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग परिवाराला अन्नधान्य किट मिठाई तसेच पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना साडी व कपड्यांचे आणि मिठाईचेवाटप करण्यात आले.

नचिकेत बाळ आश्रम येथील बालकांना कपड्यांचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. मोहन नगर परिसरातील मदर तेरेसा आश्रमामध्ये ज्येष्ठांना औषधे व स्वेटर वाटप करण्यात आलं. मध्यप्रदेश खांडवा येथे संपन्न झालेल्या
नॅशनल एल्बो स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराची मान उंचवत सुवर्ण पदक पटकावणार्या खेळाडूंचा सन्मान करून त्यांच कौतुक करण्यात आलं. त्याचप्रमाणे देहू येथील गो शाळेस चारा देण्यात आला. याप्रसंगी पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर शहराध्यक्ष संजोग वाघेरे मा.महापौर आजम भाई पानसरे माजी महापौर नगरसेवक योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम ,शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेविका वैशाली काळभोर ,नगरसेवक शीतल शिंदे ,नगरसेवक रोहित आप्पा काटे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ अ प्रभाग समिती अध्यक्ष शैलेश मोरे ,नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नगरसेवक राहुल बालघरे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड ,सद्गुरु नाना कदम, बाळासाहेब तरस, शेखर ओव्हाळ ,माजी स्थायी समिती सभापती जगदीश शेट्टी ,अतुल शितोळे ,माजी उपमहापौर मोहम्मद भाई पानसरे ,माजी नगरसेवक नारायण बहिरवडे ,अनंत कोराळे, काळुराम पवार, शिक्षण मंडळ माजी उपसभापती माईला खत्री, गोविंद भोसले, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, प्रकाश जैन ,दिलीप सोनिगरा, राकेश सोनिगरा, केतून सोनिगरा, बाबू शेट्टी, महेश काटे स्वीकृत नगर सदस्य सुनील कदम ,प्रविण जगताप, प्रमोद शिंदे आदी मान्यवर तसेचविविध राजकीय पक्ष तसेच मा.नगरसेवक प्रसाद शेट्टी यांच्या वरती प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे संयोजन कै. प्रशांत शेट्टी प्रतिष्ठान यशस्वी मित्र मंडळ शितल शिंदे मित्रपरिवार सूर्योदय उर्फ बाबुभाई शेट्टी मित्रपरिवार यांच्यावतीने करण्यात आला.