मागच्यावेळी युती तुटल्याची घोषणा करणारे एकनाथ खडसे युतीवर म्हणतात… 

0
683

जळगाव, दि. १९ (पीसीबी) – शिवसेना- भाजप युतीचा निर्णय जाहीर करण्यासाठी भाजप आणि शिवसेना नेत्यांची सोमवारी (दि.१८) मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद झाली. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यावेळी  हजर नव्हते. मात्र, खडसे यांनी   जळगावातून युतीचे स्वागत केले आहे.  

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपला अनुकूल वातावरण होते. त्यामुळे युती न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता. पक्षाचा नेता म्हणून ती घोषणा करण्याची जबाबदारी माझ्यावर दिली होती. तो निर्णय माझा एकट्याचा नव्हता, तर तो सर्वांचा होता, असे खडसेंनी यावेळी स्पष्ट केले.

सध्याच्या परिस्थितीमध्ये युती असायला हवी, असा विचारप्रवाह  होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा केली आहे. आज ते नेतृत्व करत आहेत.  जर त्यावेळी युती तोडली नसती, तर भाजपचे सरकार आणि आमचा मुख्यमंत्री होऊ शकला नसता. आता युती झाल्याने मुख्यमंत्री युतीचा असेल,  असे खडसे  म्हणाले.