महिला आरक्षणाबाबत सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे – शरद पवार

0
781

पुणे, दि. ८ (पीसीबी) – महिला धोरणाचा २५ वर्षांचा टप्पा पूर्ण होत आहे. या निमित्ताने सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महिला आरक्षणाच्या बाबत वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केले. ‘महिला स्वयंसिद्धतेकडे वाटचाल’ या कार्यक्रमात शरद पवार यांनी महिला आरक्षणावर भाष्य केले.  

यावेळी  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना आमदार नीलमताई गोऱ्हे आदी उपस्थित होते.

पोलीस खात्यातील महिलांवर विश्वासाने जबाबदारी दिली जात नाही? या महिला पोलिसांना फक्त बंदोबस्तासारखी कामे  का दिली जातात? महिला अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी दिली तर त्यांच्या क्षमतेतही वाढ होईल. कर्तृत्त्वात कमतरता नाही तरीही महिलांना संधी दिली जात नाही. ही मानसिकता बदलण्याची गरज  असल्याचे मत  पवारांनी यावेळी व्यक्त केले.

महिलांबाबत प्रॉपर्टी अधिकारांचीही अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. कारण वडिलांना, भावाला त्रास येऊ होऊ नये. नात्यांमध्ये कटुता येऊ नये, असा विचार महिला करतात. महिलांनीही याबाबत ठामपणे उभे राहून विचारांमध्ये बदल करण्याची गरज आहे, असेही मत  पवार यांनी व्यक्त केले.