“महापालिकेच्या लाचखाेर अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई लवकरात लवकर करावी” – महापौर माई ढोरे यांची मागणी

0
187

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : महापौर कक्षामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर माई ढोरे यांनी महानगरपालिकीतील बँक खात्यावर लाच घेणारे अधिकारी डॉ.अनिल रॉय, सुनील लोंढे व सुनील बेळगांवकर यांच्यावर आयुक्तांनी लवकरात लवकर कारवाई करावी व तो पर्यंत त्याना सक्तीच्या रजेवर पाठवा, अशी मागणी केली आहे.

उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पुराव्यासह बँक खात्यावर लाच घेणारे अधिकारी डॉ.अनिल रॉय, सुनील लोंढे व सुनील बेळगांवकर यांच्यावर केलेल्या आरोपाला समर्थन दिले.

“यावेळी बोलताना ढाके म्हणाले कि, “अधिकाऱ्यांनी बँक खात्यावर पैसे घेतले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही आयुक्तांना सांगितले आहे. अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहात का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना महापौर यांनी अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे असे सांगितले. आता अधिकार्‍यावर आयुक्त काय कारवाई करणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. “