महापालिका रूग्णालयांसाठी 205 बाकडे खरेदी करणार

0
124

पिंपरी, दि. १२ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेची रूग्णालये आणि विविध विभागांसाठी 205 तीन आसनी बाकडे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 13 लाख 90 हजार रूपये खर्च होणार आहे.पिंपरी – चिंचवड शहराची लोकसंख्या सध्या 30 लाखांवर आहे. या लोकसंख्येनुसार, नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेचे शहरात 28 दवाखाने आहेत. तर, तालेरा रूग्णालयासह सात रूग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे.

सद्यस्थितीत महापालिकेमार्फत 300 खाटांचे नवीन थेरगाव रूग्णालय, 100 खाटांचे नवीन जिजामाता रूग्णालय, नवीन भोसरी रूग्णालय तसेच आकुर्डीतील प्रभाकर कुटे स्मृती रूग्णालय अशी चार रूग्णालये अत्याधुनिक सोयी-सुविधांसह सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेची ही रूग्णालये आणि विविध विभागांसाठी तीन आसनी 205 बाकडे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छूक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. चिंचवड येथील आरथ्रॉन टेक्नोलॉजी यांनी तीन आसनी बाकड्यांसाठी प्रति नग 6 हजार 785 रूपये दर सादर केला. हा दर अंदाजपत्रकीय दरापेक्षा 53.60 टक्के कमी म्हणजेच 13 लाख 90 हजार रूपये इतका आहे. त्यानुसार, हे दर स्विकृत करण्यात आले आहेत.