महापालिका इमारतीसमोर क्लीनिकला आग

0
265

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य इमारतीच्या समोर एका क्लीनिकला आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. 22) पहाटे सव्वापाच वाजता घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका इमारतीच्या समोर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये एका क्लीनिकला आज पहाटे आग लागली. अग्निशमन विभागाला माहिती मिळताच मुख्य केंद्राचा एक आणि प्राधिकरण उपकेंद्राचा एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीत साहित्य जळाल्याने क्लीनिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.