मला इंग्रजी येत नाही, इंग्रजीत बोललो तर जोक होतो – रावसाहेब दानवे

0
514

नाशिक,दि.१९(पीसीबी) – “मला इंग्रजी येत नाही. मी इंग्रजीत बोललो तर जोक होतो,” अशी राजकीय फटकेबाजी भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिकच्या गोकुळ फाऊंडेशनच्या एल. डी. पाटील अकॅडमीतील इंग्रजी मीडियम इमारतीच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.

“मला इंग्रजी येत नाही. मी तोडकीमोडकी इंग्रजी बोलतो. माझे शिक्षण मराठीतून झाले आहे. आमच्याकडे इंग्रजी शाळा नव्हत्या. मी इंग्रजी बोललो तर जोक होतो,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

“आमदार सीमा हिरे आणि दिनकर अण्णा पाटील यांचे कायम भांडण व्हायचे. ते मिटवण्याचे काम मी केलं, असेही दानवे म्हणाले. पुढच्या पाच वर्षात अजून काही होईल सांगता येत नाही,” असेही दानवे यावेळी म्हणाले.

“नटवरसिंग खुर्चीवर बसतील म्हणून ब्रम्हदेव देवाने पाणी दिल नाही. अटलजींना पाणी दिले, दुसऱ्यांना चहा दिला. तिसऱ्याला सुपारी दिली, मग मला का नाही? असा प्रश्नही दानवेंनी उपस्थित केला.

मी २२ तारखेला जम्मू काश्मीरला जाणार आहे. तिथल्या लोकांशी प्रत्यक्ष चर्चा करणार आहे. त्या लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेणार आणि सरकारला कळवणार आहे. केंद्राचे विशेष लक्ष जम्मू कश्मीरकडे आहे. ज्या योजना पोहचल्या नाहीत, त्या पोहोचवण्याचं काम सरकार करत आहे, असेही दानवे म्हणाले.