मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात योग्य निर्णय होईल अशी खात्री – खासदार उदयनराजे भोसले

0
343

मुंबई, दि, २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले आहे, यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. मराठा आरक्षणाबाबत योग्य निर्णय होईल अशी खात्री आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हंटले.

राज्यात शैक्षणिक क्षेत्रात व सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधी ३० नोव्हेंबर, २०१८ मध्ये राज्य सरकारने कायदा मंजूर केला होता. या कायद्याला विरोध करणाऱ्या तर काही सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. आज (गुरुवार) या याचिकांवर उच्च न्यायालय निकाल देणार आहे.

दरम्यान या विषयावर उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील लढत आहे. सर्व अहवाल, निष्कर्ष आणि बाबींचा आधार घेत उच्च न्यायालय योग्य निर्णय देईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हंटले.