मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री-गटनेत्यांची बैठक तोडग्याविनाच गुंडाळली   

0
375

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गटनेत्यांची आज (मंगळवार ) बैठक झाली. दरम्यान या बैठकीत घटनात्मक पेच निर्माण झाल्याने कोणत्याही तोडग्याविनाच ही बैठक  आटोपती घेण्यात आली.तर  आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ठाम आहोत, पण मागासवर्ग आयोगाच्या अहवालाऐवजी आरक्षणाचा एटीआर अर्थात कृती अहवाल मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर सरकार लावत असलेला नियम मराठा आरक्षणाला लागू होत नाही. त्यामुळे अहवाल मांडण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत.