महिलेला अश्लील व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये अॅड करणाऱ्या अॅडमिनला अटक

0
847

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  अश्लील व्हॉटस् अॅप ग्रुप बनवून त्यामध्ये एका महिलेला अॅड केल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबईतील माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार वॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन मुश्ताक अली अहमद (वय २४, रा. मुंबई, मुळ रा. पश्चिम बंगाल) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यामध्ये मुश्ताक याने पीडित महिलेला अश्लील ग्रुपमध्ये अॅड केले होते. त्या महिलेला या बद्दल कोणतीच माहिती नव्हती. तिच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ येऊ लागल्यामुळे तिने या बद्दल आपल्या पतीला सांगितले होते. त्यानंतर त्यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्या ग्रुपचा अॅडमिन मुश्ताक अहमद याला अटक केली. हा प्रकार चुकीने झाला होता, असे मुश्ताकने सांगितले आहे. माटुंगा पोलीस अधिक तपास करत आहेत.