मराठवाडा जनविकास संघातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा कपडे व मिठाई देऊन सन्मान  

0
100
  • कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे राबविला स्तुत्य उपक्रम

पिंपळे गुरव, दि.२७ (पीसीबी) – येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने कार्तिकी वारीचे औचित्य साधून पंढरपूरमधील ९५ आरोग्य कर्मचारी महिलांना साडी व पुरुषांना पोशाख, मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. 
सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव कोरके, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, ह.भ.प. निर्मलाताई थिटे, धारूरचे लोकनियुक्त ,सरपंच बालाजी पवार, आशाताई पवार, गणेश पवार ,आशिष पवार, अभिषेक पवार, वैष्णवी पवार, पंढरपूर देवस्थान मंदिर समितीतील कर्मचारी दशरथ देवकुळे, सुरेखा ढेरे आदी यावेळी उपस्थित होते.

वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले, की समाजात वावरत असताना आपल्याला समाजातील अनेक असंघटित व दुर्लक्षित घटक दिसून येतात. कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येतात. यामध्ये संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर असते. कचरावेचक, साफसफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक हे घटक समाजासाठी खूप काम करत असतात. सकाळी लवकर उठून पहाटेपासूनच मंदिरातील स्वच्छता, छोटे गल्ली रस्ते, मंदिर परिसर स्वच्छ करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान झाला पाहिजे, या दृष्टीने त्यांचा पोशाख, साडी व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.