मनसेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक; चव्हाणांच मोठे वक्तव्य

0
455

नागपूर, दि, ९ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकी दरम्यान मनसेला आघाडीत सामिल करुण घेण्याणत नाराजी दाखवण्यात आली होती, परंतू लोकसभा पराभवा नंतर मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचे संकेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. नागपूरमध्ये एका लग्न समारंभासाठी आले असताना, पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत घेण्यात पक्षात मतभिन्नता होती. पण आता मत परिवर्तन झालं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गरज भासल्यास आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास काँग्रेस मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असंही चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ सोनिया गांधी यांची नवी दिल्ली निवासस्थानी भेट घेतली. या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांचे विधान महत्त्वाचे ठरते.