मनसेच्या आंदोलनात देशपांडे आणि नांदगावकर यांच्यांत जुंपली

0
1109

मुंबई, दि.१ (पीसीबी) – मुंबई महापलिकेच्या एल विभागावर काढलेल्या मोर्चादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. आंदोलनात मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात जुंपली. एक विभागातील अधिकाऱ्यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज चढवला. मात्र बाळा नांदगावकर यांनी त्यांना सांत केले. त्यामुळे संतापलेल्या संदीप देशपांडे आणि काही पदाधिकाऱ्यांनी आंदोलन अर्धवट सोडून काढता पाय घेतला.

विविध समस्यांवरून मनसेतर्फे आज महापालिकेच्या एल विभाग कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे एकमेव असलेले नगरसेवक संजय तुर्डे यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते.

काही महिन्यांपूर्वी नगरसेवक संजय तुर्डे यांना महापालिकेच्या एल विभागातील कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना जेलमध्येही रहावे लागले होते. यावर आक्रमक होत मनसेने विविध प्रश्नावरुन आज एल विभागावर धडक मोर्चो काढला. यात मुंबईतून मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते ताकद दाखवण्यास जमले होते.

परंतू मुळा मुद्दा बाजूलाच राहून या आंदोलनात मनसेची अंतर्गत धुसफूस दिसून आली. अधिकाऱ्यांशी बोलताना संदीप देशपांडे यांनी आवाज चढवला. मात्र बाळा नांदगावकर यांनी त्यांना शांत केले. त्यामुळे संतापलेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी काढता पाय घेतला.