संवेदनशीलता हरपली: लोणावळ्यात कांद्याचा ट्रक उलटला; नागरिकांनी चालकाला वाचवायचे सोडून कांदे पळवले

0
833

लोणावळा, दि. १ (पीसीबी) –  मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर आज (गुरुवार) सकाळी सहाच्या सुमारास एक कांद्याने भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झाला. मात्र संवेदनशीलता हरपेल्या परिसरातील नागरिकांनी जखमी ट्रक चालकाला वाचवायचे सोडून रस्त्यावरील आणि ट्रकमधील कांदे पळवताना आढळून आले.  

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सहाच्या सुमारास लोणावळ्याजवळील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कांद्याने भरलेल्या ट्रकला अपघात झाला. हा ट्रक शंभर मीटर घासत जाऊन पुढे पुलावरून खाली कोसळला. यामुळे ट्रकमधील कांदा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरला आणि वाहतूक कोंडी झाली. या दरम्यान संवेदनशीलता हरपलेल्या नागरिकांनी अपघातग्रस ट्रक चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी ट्रकमधील आणि रस्त्यावर पसरलेला कांदा गोळी करताना आढळून आले.  मात्र बऱ्याच वेळानंतर काही सतर्क नागरिकांनी जखमी ट्रक चालकाला निगडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.