मनसेचा झेंडा वादात; तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

0
951

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपला मेकओव्हर केला असून पक्षाच्या अजेंड्याबरोबरच झेंडाही बदलला आहे. पक्षाच्या नव्या भगव्या झेंड्यावर मनसेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभारातील राजमुद्रेची प्रतिमा वापरली आहे. यावर काही संघटनांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मनसेला कारण दाखवा नोटीस पाठवली आहे.

मनसेने आपल्या नव्या झेंड्यावर छापलेली स्वराज्याच्या राजमुद्रेची प्रतिमा त्वरीत हटवावी अशी मागणी करीत संभाजी ब्रिगेडने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच जर मनसेने ही राजमुद्रेची प्रतिमा हटवली नाही तर संभाजी ब्रिगेड मनसेविरोधात आपल्या स्टाईलनं रस्त्यावर उतरेल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी दिला होता.