मनमोहन सिंग अर्थतज्ञ, पण त्यांचा फक्त बाहुला म्हणून वापर – भाजप    

0
592

नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी) – माजी पंतप्रधान  मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली  भारताने प्रगती केली नसती कारण काही जणांनी भ्रष्टाचार, कुटुंबवादासाठी त्यांचा फक्त बाहुला म्हणून वापर केला,  असा टोला भाजपने लगावला आहे. पंतप्रधान  मोदी यांच्या आर्थिक धोरणाने भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत बळकटी दिली असून आघाडीच्या देशांत स्थान दिले आहे,  असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. यावर भाजपने त्यांना उत्तर दिले आहे. संबित पात्रा  म्हणाले की,  भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. जीएसटी आणि करप्रणालीत बदल करत मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेत बदल केल्यानेच हे शक्य झाले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मनमोहन सिंग  अर्थतज्ञ होते पण पडद्यामागील काहीजणांनी त्यांचा फक्त बाहुला म्हणून वापर केला.  आपले कायदे अंमलात आणण्यासाठी तसेच भ्रष्टाचार, कुटुंबादाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा वापर करण्यात आला.   सध्या “मोदी है तो मुमकीन है” याचाच नारा दिला जात असून पंतप्रधानांनी गेल्या सहा वर्षात योग्य निर्णय घेत मजबूत अर्थव्यवस्था निर्माण केली आहे,  असे ते म्हणाले.