मध्य प्रदेशात  शालेय अभ्यासक्रमात  अटलबिहारी वाजपेयींच्या जीवनचरित्राचा   समावेश –  शिक्षणमंत्री

0
762

जयपूर, दि. १९ (पीसीबी) – मध्य प्रदेशातील शालेय अभ्यासक्रमात  दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनचरित्राचा   समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य प्रदेशचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी दिली.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी अटलजींच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात येणार आहे. आधुनिक भारतात अटलजी यांच्यासारखा दुसरा राजकीय नेता नाही. त्यांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकते. त्यांच्या जीवनचरित्रांचा पाठ्यपुस्तकात सहभाग करणे हीच खरी त्यांना शिक्षण विभागाची श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.

अटलजी यांचे बालपण,  देशातील आणीबाणी,  अणुचाचणी, कारगील युद्ध यासंबंधी या धड्यात माहिती असेल, असे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाने २०१५-१६ मध्ये पाठ्यपुस्तकात बदल केले होते. यामध्ये अनेक राष्ट्रीय दिग्गजांच्या जीवनचरित्रांचा समावेश करण्यात आला होता.