मध्यप्रदेशातील भाजपचे २५ आमदार काँग्रेसच्या संपर्कात   

0
660

भोपाळ, दि. २१ (पीसीबी) – मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार अल्पमतात असून बहुमत सिध्द करण्याची मागणी भाजपने केला आहे.  त्यानंतर आता भाजपचे २५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते आणि मंत्री पी. सी. शर्मा यांनी केला आहे. भाजपचे २५  आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

२३ मे रोजी लोकसभेचे निकाल जाहीर होतील. भाजपला केंद्रात सत्ता स्थापन करण्यास यश आले नाही, तर     तर काँग्रेससोबत  येतील, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला आहे. एक्झिट पोलचे अंदाज  पूर्वी फोल ठरले आहेत. आता २३ मे रोजी आलेले सर्व एक्झिट पोलचे अंदाज  फोल  ठरतील, असा दावाही शर्मा यांनी केला आहे.

दरम्यान, डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने २३० जागांपैकी ११४ जागा जिंकून भाजपला सत्तेतून पायउतार केले होते. भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी ११६ जागांची गरज होती. मात्र,  भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहवे लागले होते.