मतावर ठाम राहणारा सदस्य बाहेर गेला- महेश मांजरेकर

0
454

मुंबई, दि. १२ (पीसीबी)- बिग बॉसच्या घरातून काल अभिजीत केळकर एलिमिनेट झाला. महेश मांजरेकर यांनी किशोरी शहाणे आणि अभिजीत केळकर या दोघांपैकी किशोरी सुरक्षित असून अभिजीत घराबाहेर पडणार असल्याचे घोषित केले.

या आठवड्यात नॉमिनेटेड सदस्यांपैकी कोणा एका सदस्याला घर सोडून जावे लागणार होते… आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे घरातील या तीन तगडे सदस्य आणि एक नवा सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले. अभिजीत केळकर आणि किशोरी शहाणे डेंजर झोनमध्ये आले होते आणि अभिजीत केळकरला या आठवड्यामध्ये घर सोडून जावे लागले.

बिग बॉसच्या घरामधून बाहेर पडताना अभिजीतने शिवला सल्ला दिला आणि त्याने खास शिवसाठी गाणे म्हटले… महेश मांजरेकर म्हणाले “मी तुला टॉप ५ मध्ये पहिले होते, पण घरामध्ये मतं मांडणारा आणि त्या मतावर ठाम राहणारा सदस्य बाहेर गेला” असे मी म्हणेन.