पिंपरी महापालिकेची मदत पथके पूरग्रस्त भागात रवाना

0
620

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना जोरदार तडाखा बसला आहे. लाखो लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणात शेतीचे मालमत्तेची हानी झाली आहे. तेथील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून मदत पथके आणि स्वच्छता करण्यासाठी ६ जेटींग मशीन पाठविण्यात आली.    

पूरग्रस्त भागांत महापालिकेच्या वतीने स्वच्छता करण्यासाठी ६ जेटींग मशीन, तीन बोटी, एक फायर बिग्रेडचे वाहन आणि १०० कर्मचारी मदत कार्यासाठी पाठविण्यात आली आहेत. तसेच एक पाण्याचा टँकरही पाठविण्यात आला आहे.

यावेळी महापौर राहुल जाधव , सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार,  स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, कार्यकारी अभियंता रामदास तांबे,  प्रवीण लडकत, प्रशांत पाटील ,आपत्ती व्यवस्थापनचे  अधिकारी ओमप्रकाश बहिवाल सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील,  आदी   उपस्थित   होते .