मतदानासाठी जाणाऱ्या तीन मुंबईकरांवर काळाचा घाला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

0
722

कामशेत, दि.२१ (पीसीबी) – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी खासगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. हा अपघात सोमवार (दि.२१) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ  घडला.

सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २१ ) पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कामशेत बोगदापासून काही अंतरावर पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही खासगी बस कामशेत बऊर गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसली. अपघातावेळी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. असून १६  जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते.