राम मंदिराबाबत तडजोड मान्य होती, तर शेकडो लोकांचे रक्त का सांडले? – शिवसेना

0
632

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – रामजन्मभूमी प्रकरणात दोन्ही बाजूच्या पक्षकारांना मध्यस्थी व तडजोड  करायची होती, तर मग पंचवीस वर्षांपासून हा वाद का सुरू ठेवला?  यावरून शेकडो लोकांचे रक्त का सांडले,’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

राज्यकर्ते व सर्वोच्च न्यायालय अद्यापही राममंदिर प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे तीन मध्यस्थ काय करणार,’ असा सवाल उद्धव यांनी करून तोडगा निघण्याबाबत  ‘सामना’च्या अग्रलेखातून   साशंकता व्यक्त केली आहे.

भाजपविरोधात  कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे  भाजपची कोंडी झाली होती . उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत सभा घेऊन  वातावरण तापवले  होते. पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणाही दिली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थांची नियुक्ती केल्यामुळे राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा लांबणीवर गेला आहे. यावरून शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. आता शिवसेना कोणती ही भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.