भोसरी सोडून चिखलीत बैलगाडा शर्यत घेण्याची आमदार महेश लांडगे यांच्यावर नामुष्की

0
1049

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – बंद पडलेल्या बैलगाडा शर्यती कोणामुळे सुरू झाल्या ते महाराष्ट्राने पाहिले. मात्र, श्रेय घेण्यासाठी राजकीय नेत्यांची मोठी चढाओढ झाली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी स्वःताची टीमकी वाजवत श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सर्व दावे खोडून काढत शिरूर लोकसभा मदरासंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या कामासाठी काय काय प्रयत्न केले त्याचे तारिख वारासह दाखले दिल्याने आमदा लांडगे यांना आपसूक माघार घ्यावी लागली.

खासदार कोल्हे यांनी निमगाव दावडीच्या यात्रेला घाटात गाड्याचे पुढे स्वतः घोडीवर स्वार होत लोकांची मने जिंकली. त्याची सर्व कसर काढण्यासाठी भोसरीत सर्वात मोठ्या बैलगाडा स्पर्धा घेण्याचा आमदार महेश लांडगे यांचा प्रयत्न होता. यात्रा होऊन गेल्याने आता स्पर्धा कशाला म्हणत गावकऱ्यांनीच खोडा घातल्याने आमदार लांडगे यांची कोंडी झाली. बैलगाडा संघटना विरुध्द गावकरी असे व्दंद्व सुरू झाले. बैलगाड्याच्या स्पर्धांवरुन आमदारांच्या विरोधातील गावकिची नाराजी वाढत गेली.

भोसरीमध्ये बैलगाडा स्पर्धासाठी आणखी एक मुद्दा वादग्रस्त ठरला. पंचक्रोशितील चऱ्होली गावजत्रेतील बैलगाडा स्पर्धांना २० लाखांचे बक्षिस होते, मात्र भोसरीमध्ये अशा स्पर्धा घेतना केवळ ५ लाखाचे बक्षिस ठेवण्यात आले होते. भोसरीकरांना तो कमीपणा वाटला. त्याशिवाय या स्पर्धा गावच्या म्हणून नव्हे तर आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट फाऊंडेशनच्या नावाखाली घेण्यात येणार होत्या. त्यामुळे काही गावकऱ्यांनी बैठकित तो विषय छेडला आणि नंतर मतभेद वाढत जाऊन भोसरीच्या बैलगाडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

भोसरी येथे बैलगाडा स्पर्धा घेण्याबाबात आमदार महेश लांडगे स्वतः खूप आग्रही होते त्याचासाठी त्यांनी भरपूर जाहिरातबाजी केली. गावजत्रेलाच स्पर्धा घेणे उचित होते, आता त्याचा गावाला काय उपयोग. केवळ राजकारणासाठी म्हणून बैलगाडा स्पर्धा घेण्यास बहुसंख्य गावकीचा जोरदार विरोध होता. मात्र, आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाल्याने स्पर्धा गावातच घ्यायचा बैलगाडा संघटन मालकांचा निश्चय होता. अनेद बैठका पार पडल्या, पण गावकीत एकमत झाले नाही. संघटना विरोधात गावकी असा या वादाला रंग आला. खरे तर, आमदार लांडगे यांनी दोन्ही बाजुंनी समन्वय साधून तोडगा काढणे अपेक्षित होते, पण तिथे त्यांची डाळ शिजली नाही. भोसरी गाव एक झाल्याने आमदार महेश लांडगे यांना दोन्ही वेळेस निवडणुकित भरघोस मते मिळाली होती, पण आता स्वतःच्याच गावात गावकरी विरोधात चालल्याने अखेर कंटाळून आमदार लांडगे यांनी भोसरी गावात बैलगाडी स्पर्धा घेण्याचा नाद सोडून दिला आणि चिखली गावची निवड केली.

भोसरीचा घाट तयार नसल्याने तिथे अडचण आली. घाटाच्या दरम्यान अनेक विकास कामे सुरू असल्याने तिथे स्पर्धा घेणे अशक्य असल्याचा अभिप्राय महापालिका अधिकाऱ्यांनी दिल्याने प्रकरण अत्यंत प्रतिष्ठेचे झाले होते. सर्व परिस्थिती पाहून अखेर स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची नामुष्कि आमदार लांडगे यांच्यावर आली. आता देशात कधी नव्हे अशा भव्य दिव्य स्पर्धा आमदार लांडगे घेणार आहेत, पण त्या स्वतःच्या भोसरी गावात नाही तर चिखली येथे होणार आहेत. चिखली हे गाव भोसरी विधानसभा मतदारसंघात असून तो माजी महापौर राहुल जाधव यांचा प्रभाग आहे. या ठिकाणी या स्पर्धा घेतल्या तरी मोठा राजकिय फायदा होईल असाही आमदार समर्थकांचा होरा आहे. या स्पर्धेसाठी सुमारे पाऊन कोटी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पहिल्या क्रमांकासाठी जेसीबी असे भव्य बक्षिस ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. आजवर इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे एकाही बैलगाडा स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेली नाहीत. बक्षिसे मोठी असली तरी स्पर्धा भोसरी सोडून चिखलीत होणार असल्याने आमदार लांडगे यांची मोठी नामुष्की झाली आहे.