भोसरी, वाकड मधून दोन दुचाकी चोरीला

0
356

भोसरी, दि.२१(पीसीबी) : शहरात स्ट्रीट क्राईम दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनचोरी, मोबईल हिसकावणे, सोनसाखळी हिसकावणे यांसारखे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. भोसरी आणि वाकड परीसरातून वाहन चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. याबाबत रविवारी (दि. 20) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

प्रवीण कृष्णा गाढवे (वय 34, रा. खंडोबा माळ, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गाढवे यांनी त्यांनी 25 हजार रुपये किमतीची होंडा शाईन दुचाकी (एम एच 14 / एफ क्यू 6043) शनिवारी (दि, 19) रात्री आठ वाजता घरासमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

अक्षय कैलास साठे (वय 24, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी साठे यांनी त्यांची 35 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / जी क्यू 6734) थेरगाव येथे एका सलून दुकानासमोर पार्क केली होती. 16 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता चोरट्यांनी त्यांची दुचाकी लबाडीने चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.