बाणेरमध्ये साडेतीन लाखांची घरफोडी

0
205

बाणेर,दि.२१(पीसीबी) – बाणेर येथे एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये चोरी करत चोरट्यांनी तीन लाख 41 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता अल्बासिटा बाणेर येथे घडली.

भूषण गंगाधर आठवले (वय 39, रा. अल्बासिटा, बाणेर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आठवले बाणेर येथील अल्बासिटा या सोसायटीमध्ये राहतात. ते त्यांच्या घराला कुलूप लाऊन गावी गेले होते. 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता अद्यात चोरट्याने त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील बेडरूममधून तीन लाख 41 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत 20 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास करीत आहेत