भोसरी मध्ये अतिक्रमण कारवाईचा मोठा धमाका..

0
587

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठ्या कालावधीनंतर आज पासून धडक अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील नाशिक महामार्गाच्या दुतर्फा असलेली सुमारे ५०० वर अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. आज सकाळ पासून भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह ते मोशी टोलनाका दरम्यानची अतिक्रमणे काढण्याचे काम प्रचंड मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुरू कऱण्यात आले.

महापालिकेचे तब्बल ३०० अधिकारी, कर्माचारी तसेच १० जेसीबी, २० ट्रक व टेंपो आणि शेकडो पोलिसांचा ताफा या कारवाईत सहभागी झाला आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या या मोहिमेचे भोसरीकरांनी समाधान व्यक्त केले आहे. परिसराला आलेला बकालपणा संपूण जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेवर प्रशासक नियुक्ती झाल्यापासून अतिक्रमण मोहिमेची आखणी सुरू आहे. गेले आठवडाभर भोसरी परिसरातील ३२६ नागरिकांना नोटीस देण्यात आली होती. त्यापैकी १०० अतिक्रमणे आज पाडण्यात येणार असल्याचे सहआयुक्त अण्णा बोदाडे यांनी म्हटलंय