भोसरीत फायद्याचे आमिष दाखवून वृध्दाला १० लाखांचा गंडा

0
735

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – चांगला फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका वृध्दाला बांधकाम व्यावसायिकांनी तब्बल दहा लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना भोसरी येथील सेंच्युरीएन्का येथे घडली.

ज्ञानेश्वर गंगाराम हुलावळे (वय ६६, रा. मयूर कॉलनी, कोथरूड) असे फसवणुक झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बांधकाम व्यावसायिक दिगंबर ज्ञानदेव पाटील (रा. प्राधिकरण, निगडी), प्रसाद कृष्णा (रा. इंद्रायणीनगर, भोसरी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर आणि प्रसाद बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची चिखली येथे आराध्या डेव्हलपर्स ही बांधकाम साईट सुरू आहे. त्यामध्ये फ्लॅट घेण्यात गुंतवणूक केली तर भविष्यात फायदा होईल, असे आमिष दाखवून फिर्यादी वध्द ज्ञानेश्वर यांना फ्लॅट घेण्यास भाग पाडले. फ्लॅट घेण्यासाठी ज्ञानेश्वर यांनी जानेवारी २०१३ मध्ये दोघा आरोपींना दहा लाख रुपये चेकद्वारे दिले होते. मात्र आरोपींनी सहा वर्षे उलटून देखील नाही फ्लॅट दिला नाही पैसे. याप्रकरणी आता दिगंबर आणि प्रसाद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.