धक्कादायक: लघुशंकेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

0
1539

औरंगाबाध, दि. १६ (पीसीबी) – लघुशंकेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१४) सायंकाळी सातच्या सुमारास औरंगाबाद चिकलठाणा औद्योगिक परिसरातील ओसाड मैदानावर घडली.

राजू जमधडे (वय १९) आणि सचिन साबळे (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो एम.सिडको पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पिडित मुलगी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील ओसाड मैदानावर लघुशंकेसाठी गेली होती. यावेळी दोघा आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी घरी रडत आल्यानंतर हा प्रकार घरच्यांना कळला. बदनामी होईल या भीतीने मुलीच्या पालकांनी मंगळवारी घाबरत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवत राजू जमधडे याला ताब्यात घेतले तर सचिन साबळे हा फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी आणि एम. सिडको पोलीस पुढील तपास करत आहेत.