भोसरीत गावठी कट्यासह जिवंत काडतुसे बाळगणारा गजाआड

0
1448

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एका टोळक्याला अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी कट्यासह २ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी (दि. २०) रात्रीच्या सुमारास केली आहे.

कुलदिप लालदेव चौहान (वय २२, रा. महादेवनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरीतील लांडेवाडी परिसरात कुलदिप चौहान हा गावठी कट्यासह उभा असल्याची पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुस सापडले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.