भीमा कोरेगाव ; राज्य सरकार या प्रकरणाची समांतर चौकशी करणार

0
359

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्र्यांची महत्त्वाची बैठक पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली. 

 या बैठकीत भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासावर प्रामुख्याने खल झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एएनआयला या संदर्भात माहिती दिली. ‘राज्य सरकार या प्रकरणाची समांतर चौकशी करणार आहे. त्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात येणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्री उद्ध ठाकरे यांनी हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे देण्यास मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. या प्रकरणाचा तपास समांतर पातळीवर करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.