भीमा कोरेगाव तपास एनआयएकडे सोपविण्याच्या निर्णयावर शरद पवार नाराज

0
342

कोल्हापूर, दि.१४ (पीसीबी) – मुख्यमंत्र्याच्या या निर्णयावर मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत अनिल देशमुख बोलत होते.

देशमुख म्हणाले, ”भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राज्याकडून काढून घेणे अयोग्य आहेच, पण त्याहीपेक्षा त्यास मान्यता देणे जास्त अयोग्य आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह होती. राज्य सरकारकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. मात्र अचानक केंद्रानं हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला. भीमा कोरेगाव एल्गार परिषदेचा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मनावरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपले अधिकार वापरत भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला. अशी माहिती अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.