भाषण थांबवा; अजाण सुरू होताच आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सुचना

0
2447

बुलढाणा, दि. १९ (पीसीबी) –  मशिदीवरील भोंग्याबाबत शिवसेनेची आक्रमकता सर्वश्रुत आहे. मात्र, युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी  शिवसेनेच्या परंपरागत भूमिकेला छेद दिला. आज (सोमवार) बुलढाणा येथे मशिदीवरील भोंग्यातून अजानचा आवाज सुरू होताच शिवसेनेच्या खासदाराला भाषण थांबवण्याच्या सुचना दिल्या.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर येथे जिल्ह्यातील २५० आत्महत्या शेतकरी कुटुंबाना कौटुंबिक साहित्याचे वाटप आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे भाषण सुरू  असताना मुस्लिम बांधवांच्या नमाजसाठी जवळ असलेल्या मशिदीतून अजान सुरू झाली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी  अजानचा सन्मान करण्यासाठी खासदार जाधव यांना आपले भाषण थांबविण्याच्या सुचना दिल्या.

दरम्यान यावेळी त्यांनी इतर कोणत्याही विषयांवर भाष्य करण्याचे टाळले. दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मी आलो, असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले. तर ठाकरे यांचा अकोला जिल्ह्याचा दौरा अचानकपणे रद्द  झाल्याने त्यांनी मोबाईलवरून जनतेशी संवाद साधला.