भारताविरुद्ध टॉस जिंकून न्यूझीलंडची फलंदाजी

0
438

लंडन, दि, ९ (पीसीबी) – वर्ल्डकपमध्ये आज मँचेस्टरवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलची लढत सुरु आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताची फलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची गोलंदाजी, असे चित्र आजच्या सामन्यात दिसेल. या मैदानावर या वर्ल्ड कपमधील पाच लढती झाल्या आहेत आणि या पाचही लढती प्रथम फलंदाजी करणारा संघच जिंकला आहे. तेव्हा नाणेफेक महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे नाणेफेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.