बनावट स्टॅम्प आणि बिले सादर करुन कंपनीला साडेअठरा लाखांचा गंडा

0
320

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – बनावट स्टॅम्प आणि बिले सादर करुन एका लॉजिस्टीक कंपनीला तब्बल १८ लाख ४७ हजारांचा गंडा घालण्यात आला. ही घटना २५ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१८ दरम्यान चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी लॉजिस्टीक व्यावसायिक महेश रमाकांत पुण्यार्थी (वय ४६, रा. ३०१, रामकोअर मेन्शन, वलीपीर रोड, कल्याण) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुमीत गांधी, उज्वला गांधी, राजेंद्र गौरंग पटणी, महेश जैन आणि रुपल राजदिप या पाच जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०१७ ते २९ मे २०१८ या कालावधीत आरोपींनी बनावट स्टॅम्प आणि बिले सादर करुन फिर्यादी महेश यांच्या लॉजिस्टीक कंपनीला गाडी भाड्यापोटी वेळोवेळी तब्बल १८ लाख ४७ हजारांचा गंडा घातला. महेश यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.८ जुलै) धाव घेत तक्रार दाखल केली. चिंचवड पोलिस तपास करत आहेत.