भारताच्या मिराज २००० विमानांची ताकद पाहून पाकिस्तानची विमाने माघारी परतली

0
956

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – भारताच्या १२  मिराज २०००  या लढाऊ विमानांच्या ताफ्याने आज (मंगळवार) पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला.  पाकिस्तानच्या एफ १६ विमानांचा ताफा भारताच्या  विमानाला प्रत्युत्तर देण्यासाठी आकाशात झेपावला. मात्र, भारतीय विमानांचा ताफा, भारताकडील स्फोटकांच्या साठा आणि मिराज २००० विमानांची मारक  क्षमता पाहून पाकिस्तानच्या  विमानांनी  माघारी जाणे पसंत केले.

पाकिस्तानची विमाने  मिराजच्या प्रत्युत्तरासाठी पुढे आलीच नाहीत. या घटनेने भारतीय वायू सेनेची ताकद,  लढाऊ विमानांची क्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.  जगातील चौथ्या मोठ्या हवाई दलासमोर आपला टिकाव लागणार नाही. हे लक्षात आल्यावर पाकिस्तानची विमान घाबरली.

भारतीय हवाई दलाने  निंयत्रण रेषा ओलांडून जैशच्या तळावर  हल्ला केला. पहाटे ३.३० वाजता पाकिस्तानमधील बालाकोट भागात एअर स्ट्राईक करण्यात आला. १ हजार किलोंचे बॉम्ब फेकले. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.