भाजप-शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल; शरद पवारांचे भाकीत

0
785

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नाहीत,असे सांगून भाजप आणि शिवसेनेची लोकसभेसाठी युती होईल. मात्र, विधानसभेसाठी होण्याची शक्यता नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अनेक विषयांवर भाष्य केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होणार नाहीत. कारण, आता तशी परिस्थती राहिली नाही, असे पवारांनी  सांगितले.  दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी एकत्र  होण्याची   चर्चा सुरु आहे. राष्ट्रपतींनीही ‘एक देश, एक निवडणूक’चा उल्लेख केला होता. त्यामुळे लोकसभा-विधानसभा एकत्र  होतील, असे अंदाज व्यक्त केले जात असताना पवारांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

बोफोर्सची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी  भाजपने केली होती.   त्यामुळे  आता राफेल खरेदी व्यवहाराची चौकशी  संयुक्त संसदीय समितीकडून करण्याची  मागणी फार काळ भाजपला टाळता येणार नाही, असे शरद पवार म्हणाले. दरम्यान, मतदान मतपत्रिकेवर घेण्याबाबत सर्व विरोधी पक्षांची येत्या १५ दिवसात बैठक होण्याची शक्यता आहे, अशीही माहिती पवारांनी यावेळी दिली.