भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला निवडणूक आयोगाचा दणका; खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश   

0
725

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीसा पाठवल्या आहेत. त्यांना १० मार्च २०१९ पर्यंत खर्चाचा तपशील सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत, अशी माहिती   राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

याबाबत सहारिया  म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाच्या १५ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक  आहे. याबाबत वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना वेळोवेळी  आठवण करून दिली होती.  त्यामुळे आपली नोंदणी रद्द का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यता प्राप्त अशा १४ राजकीय पक्षांचा नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष,  भाजप,  राष्ट्रवादी काँग्रेस ,  भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,  शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल (युनायटेड) या पक्षांचा समावेश आहे.