भाजप युवती आघाडीच्या उपाध्यक्षपदी तृप्ती गुजर, तर सदस्यापदी मोहिनी कलापुरे यांची निवड

0
501

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भाजप युवती आघाडीच्या उपाध्यक्षपदी तृप्ती गुजर यांची नुकतीच निवड करण्यात आले. भाजपचे आमदार योगेश टीळेकर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

त्याचबरोबर मोहिनी कलापुरे यांची भाजप युवती आघाडीच्या कार्यकारिणी सदस्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार टीळेकर यांनी निवडीचे पत्र दिले.

याप्रसंगी अनुप मोरे, भाजप सरचिटणीस विक्रांत पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.